प्रजासत्तादिनी शेतकर्यांच्यावतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान प्रचंड हिंसा झाली. यामध्ये मोठ्या संख्येन दिल्ली पोलिस कर्माचारी जखमी झाले आहे. शेतकर्यांनी जबरदस्ती लाल किल्ल्यावर घुसण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी त्यांना अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही हिंसा झाली असल्याचे दिल्ली पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दिल्लीच्या सिमांवर भारी बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये सिंघू बॉर्डवर खीळे तसेच पाच ते सात लेअरचे बॅरीकेड्स लावले आहे. शेतकरी दिल्लीत घुसू नयेत म्हणून पोलिसांनी केलेल्या त्या बंदोबंस्तावरून प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. “प्रधानमंत्रीजी अपने किसानों से ही युद्ध” अशी टॅगलाईन देत बंदोबस्ताचे चित्रण केलेला तो व्हिडीअो प्रियांका गांधींनी ट्वीट केला आहे.
अतिशय कडक बंदोबस्त सिंघू बॉर्डर आणि दिल्लीच्या ईतर सिमांवर करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्यावर खिळे लावण्यात आले आहे. तसेच पाच ते सात लेअरचे बॅरीकेड्स लावले आहेत जेणेकरुन कुणीही त्यावरुन ऊडी मारून येउ नये. सोबतच रस्त्याच्या दोन्ही कडांना सिमेंट कॉंक्रीट टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थीती ज्याप्रमाणे सुरक्षा केली जाते असाच तो बंदोबंस्त आहे. परिणामी विरोधी पक्षातील अनेक नेते या बंदोबस्तावरून दिल्ली पोलिसांवर टीका करत आहे.
सरकारचा हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीसुद्धा यावर टीका केली आहे. “एवढी सुरक्षा चिन सिमेवर तैनात केली असती तर कदाचित चिनी आत घुसू शकले नसते” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाना साधला आहे.