प्रियंका गांधी यांना काँग्रेसची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता

52

शनिवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णायक बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी नकार दिल्यानंतर प्रियांकाच्या नावाला पर्याय म्हणून मान्य केले जाऊ शकते.कॉंग्रेसमध्ये प्रियांकाला अध्यक्ष बनविण्याची मागणी यापूर्वीही बर्‍याचदा उठली होती, कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाच्या पुढाकाराने सोनिया गांधी यांची आणि २३ जणांच्या गटातील नेत्यांची बैठक होत आहे. 

कॉंग्रेसमधील प्रियंकाच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी आणि त्यांच्या टीमच्या कार्यशैलीबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा आक्षेप आणि प्रश्न ज्याप्रकारे आहेत, त्यामुळे कमलनाथ यांना राहुलच्या नावावर सर्वांची सहमती मिळवण्यास कठीण जात आहे.परंतु कमलनाथ यांनी आतापर्यंत ज्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे त्यापैकी बहुतेकांनी राहुल यांच्या नावाबद्दल स्पष्टपणे मतभेद व्यक्त केले आहेत. 

सोनिया गांधींनी कमलनाथ यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी राहुल यांच्या नावावर सहमतीची जबाबदारी सोपविली आहे.काही नेत्यांनी अगदी सरळ असं म्हटले आहे की, गांधी घराण्याशिवाय आपण कॉंग्रेसची कल्पनाही करू शकत नाही, पण राहुलऐवजी प्रियांकाला पक्षाचं नेतृत्व सोपवलं तर बरं होईल.

राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या एका निष्ठावंताने सांगितले की, जर प्रियंका गांधी समोर येऊन नेतृत्व करत असतील, तर फक्त काँग्रेस कार्यकर्ते नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही काँग्रेसबद्दल नवीन विश्वास आणि उत्साह निर्माण होईल.त्यामुळे आत्ता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे लक्ष लागले आहे.