काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.
केंद्र सरकार दिशाभूल करु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. “या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचं सांगितलं जात,” असल्याची टीका त्यांनी केली आहे.अतिरिक्त पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्यस्थी करावी यासाठी काँग्रेसने संपूर्ण देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचं शिष्टमंडळ संसद इमारतीजवळील विजय चौक ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहे.
काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तीन नेते राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात”. दरम्यान राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याआधी काँग्रेस मुख्यालयाबाहेर १४४ कलम लागू करण्यात आलं आहे.पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना हटवलं असून ताब्यात घेतलं