पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पास करा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, माहिती नाहीत. ही पोरं तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.