सचिनच्या पोस्टरवर काळे तेल ओतून केला निषेध

24

शेतकरी आंदोलनावरुन देशातील वातावरण चांगलेच तापते आहेे. ईतर राष्ट्रातील सेलीब्रिटींनी शेतकरी अंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्वीटवर भारतातील खेळाडू आणि कलाकार चांगलेच बरसले. यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचादेखील समावेश होता.

सचिनच्या ट्वीटनंतर मात्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ असणार्‍या गटामध्ये नाराजीचर वातवरण निर्माण झाले. आणि यादरम्यानच केरळमधील युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरवर काळे तेल ओतत त्याचा निषेध केला आहे. मागील दोन महिन्यांपासून शेतकरी हाडे गोठवणार्‍या थंडीत आंदोलन करीत आहे. तेव्हा सचिनला जाग का आला नाही, एवढ्या दिवसांत त्यांने शेतकर्‍यांप्रती सहानूभूती का दाखविली नाही? आत्ताच ईतर राष्ट्रातील व्यक्ती आंदोलनाला समर्थन देत असतांना सचिनला आपल्या सार्वभौमत्वाची आठवण कशी काय येते? असे सवाल ऊपस्थित करत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा निषेध नोंदवला आहे. यासंबंद्धिचे वृत्त एएनआयने दिले आहे.

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर हरीयाणा आणि दिल्ली सिमेवरील काही भागातील ईंटरनेटसेवा बंद करण्यात आली होती. यासंबंद्धिचे वृत्त अमेरिकेतील वृत्तवाहिनी सीएनएनने दिली होती. या बातमीचा आधार घेतच जगविख्यात पॉपस्टार रिहाना हीने “आपण यावर बोलले पाहिजे” असे ट्वीट केले होते. त्यानंतर जगभरातून शेतकरी अंदोलनाला पाठींबा मिळत गेला. त्यापठोपाठ ग्रीटा थनबर्ग आणि कमला हॅरीस यांची भाची मीना हॅरीस यांनीसुद्धा आम्ही आंदोलनासोबत आहोत या आशयाचे ट्वीट करत आंदोलनाला पाठींबा दिला होता. ग्रीटा थनबर्गची जागतीक पर्यावरणवादी कार्यकर्ता म्हणून तिची अोळख आहे. अनेक देशांत ग्रीटाचे समर्थक आहेत.

मात्र ईतर देशांतून उमटणार्‍या या प्रतिक्रियांवर आपल्या देशातील काही खेळाडू आणि कलाकारांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यामध्ये कंगना रनौत नंतर सचिन तेंडूलकरने प्रतिक्रिया दिली होती. “आमच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये लक्ष घालण्यावी गरज नाही आम्हाला आमच्या सार्वभौमत्वाची जाण आहे.” अशा आशयाचे ट्वीट #IndiaTogether या हॅशटॅगखाली केले होते. त्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंण्ड होण्यास सुरुवात झाली. विराट कोहली, रवी शास्त्री, अक्षय कुमार, केंद्र सरकारमधील काही मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयानेसुद्धा या हॅशटॅगखाली ट्वीट करत इतर देशातील सेलीब्रीटींना सुनावले. त्यानंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ असलेल्या गटांत प्रचंड नाराजीचे आणि संतापाचे वातावरण होते. शेतकर्‍यांप्रती या मोठ्या कलाकारांना आणि खेळांडूंना आत्नीयताच नाही का? असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात आला आणि यातून सचिनच्या पोस्टरवर काळे तेल अोतत निषेध करण्याचा प्रकार केरळमध्ये घडला.

मात्र एवढ्या दिग्गज आणि भारतरत्न असलेल्या खेळाडूचा अपमान केल्यामुळेसुद्धा देशात नाराजीचे वातवरण आहे. एएनआयच्या ट्वीटचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा यावर ट्वीट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचा अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?,’ असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.