पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या गगनाला भिडले आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखे घरगुती गॅस सिलेंडरच्या भावांनीसुद्धा ऊच्चांकी गाठली आहे. ईंधन दरवाढीवरुन कॉंग्रेस सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करते आहे. याचेच दृश्य अमरावतीतसुद्धा बघायला मिळाले. अमरावती शहरामध्ये थेट घोडा आणि सायकल वर स्वार होऊन, गॅस सिलेंडर सोबत घेत थेट पेट्रोल पंप गाठत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत.
अगोदरच कोरोनाने सामान्याचे कंबरडे मोडले आहे. माोठ्याप्रमाणात आर्थिक चणचण भासते आहे. अशावेळी ईंधनाच्या दरांत होणार्या वाढीमुळे सामान्यांच्या खिशावर अधिक भार येतो आहे. परिणामी कॉंग्रेसने ईंधन दरवाढीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमरावतीतील युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील राजकमल चौक येथुन आंदोलनास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्ये घोड्यावर स्वार झाले. तसेच ईतरांनी सायकलचा आधार घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी थेट मालवीय चौक येथील पेट्रोल पंप गाठत घोड्यावर स्वार होत निदर्शने केली. तसेच गॅस सिलेंडर घेऊनसुद्धा कार्यकर्ते याठिकाणी पोहचले होते.
युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सागर देशमुख तसेच जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्यासंख्येने युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ईंधन दरवाढीवर सरकारच्या नाकर्ते धोरणाचा पाढाच सागर देशमुख यांनी यावेळी वाचला. तसेच कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी आणि निदर्शनेसुद्धा करण्यात आली.