शिवसेना आमदाराच्या निधीतून कोरोना उपाययोजनांसाठी 50 लाखांची तरतूद

15

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विद्यमान शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी काल (दि.4) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरिता आपल्या स्थानिक विकास निधीतून आर्थिक मदत करू अशी ग्वाही दिली.

विप्लव बजोरीया व त्यांचे वडील आमदार गोपीकिशन बाजोरिया या दोघांच्या स्थानिक विकास निधीतून 50 लाख रुपये तरतूद कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करिता मंजूर केली. त्या संबंधीचे पत्र जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

या निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयाकरिता एक अद्यावत अशी रुग्णवाहिका व जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लंन्ट करिता हा पैसा खर्च करावा, अशी अपेक्षा आमदार विप्लव बाजोरिया यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आमदार गोपीकिशन बाजोरिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते चंदु शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करिता आवश्यक ती सर्वोत्तपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही आमदार बाजोरिया यांनी दिल्याची माहिती आहे.