महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा आढावा घेऊन महाराष्ट्राची स्पष्ट भूमिका रोखठोकपणे मांडणाऱ्या शासकीय पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे,मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर,राज्यमंत्री सतेज पाटील,दत्तात्रय भरणे,खासदार अरविंद सावंत,मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
शासनाच्या सीमाप्रश्न विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. सीमा प्रश्नाचे विशेष कार्य अधिकारी श्री. दीपक पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.