टीकटॉकस्टार आणि मुळची बीडमधील परळी येथील राहणारी तरुणी पुजा चव्हान हीच्या अात्महत्येनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले. पुजा चव्हान प्रकरणांत नाव पुढे आलेले वनमंत्री संजय राठोड हे पंधरा दिवसांनी माध्यमांसमोर आले. पंधरा दिवस राठोड नॉट रीचेबल असल्यामुळे शंका ऊपस्थित करत पंधरा दिवस राठोड कुठे होते असा सवाल विरोधी पक्षातील भाजपने केला अाहे. पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणावरुन भाजप प्रदेश ऊपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सुद्धा पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमिवरच प्रविण दरेकर यांनी थेट पोलिस महासंचालकांना पत्र लिहीत काही प्रश्न ऊपस्थित केले आहेत.
- पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार अरुण राठोड बेपत्ता आहे. पोलिसांनी अरुणला ताब्यात घेण्यासाठी काय प्रयत्न केले?
- अरुण राठोडचे काय झाले तो कुठे आहे याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न आहे. पोलिस महासंचालक पत्रकारपरिषद घेऊन तपासाची माहिती का देत नाही?
- संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या तपासाची गती काय आहे? याबाबत पोलिस महासंचालकांनी जनतेस माहिती द्यावी
- यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात अरुण राठोड व एका महिलेने गर्भपात केल्याची माहिती आहे. मिळालेल्या या माहितीवर पोलिस तपास करत आहेत का?
- कोरोनाचे नियम पाळण्यासंबंद्धी मुख्यमंत्री सातत्याने जनतेस आवाहन करत आहेत. अन्यथा दंड करु, लॉकडाऊन करु अशी धमकीसुद्धा देत आहेत. मात्र त्यांच्याच मंत्रीमंडळातील आरोपी असणारा मंत्री पंधरा दिवस लपून बसल्यानंतर शक्तीप्रदर्शन करतो यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार?
- अरुण राठोडच्या घरात चोरी झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास केला का? केला तर त्यातून काय निष्पन्न झाले?
- आपल्या मंत्रीमंडळातील संशयीत मंत्री पंधरा दिवस गायब होते. ते गायब होते? यादरम्यान त्यांनी पुरावे नष्ट केलेत का? मुख्यमंत्री म्हणून आपण त्याची चौकशी केली का? आणि केली असेल तर त्यासंबंद्धी जनतेसमोर सांगावे.
असे पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणातील काही महत्वाचे प्रश्न प्रविण दरेकर यांनी या पत्रात विचारले आहेत. तसेच विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी हे प्रश्न केले आहेत. माझ्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा ही प्रश्न पडली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री , गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांनी माझ्या प्रश्नांची ऊत्तरे द्यावीत असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.