बीड जिल्ह्यातील परळी शहारतील तरुणी पुजा चव्हान हीच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या अॉडिअो क्लीपने संपूर्ण महाराष्ट्रातले वातवरण ढवळून निघाले होते. पुजा चव्हानच्या आत्महत्येनंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले आणि त्यानंतर भाजपने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. यानंतर पुजा चव्हान प्रकरणाला दिवसेंदिवस नवे वळण लागत गेले. आताही पुजा चव्हानची चुलत आजी असणार्या शांताबाई राठोड यांनी पुजाच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप करत त्यांची हत्या होणार असल्याचे संकते दिले.
शांताबाई राठोड यांनी पुजाच्या आईवडिलांनी याप्रकरणी पाच कोटी रुपये घेतले असल्याचा आरोप केला होता. मात्र पुजाच्या वडिलांनी आरोप फेटाळून लावत परळी शहर पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ५००, ५०१, ५०२ भादंवि व कलम ६६(अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुजाचे आईवडिल स्वत:हून समोर येऊन कधीच कबुली देणार नाही. कारण त्यांनी याप्रकणी पाच कोटी रु. घेतले आहे. असा खळबळजनक दावा पुजाची चव्हानची आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करणे हे चुकीचे आहे. मी सत्य बोलते आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत माझी हत्या होण्याची शक्यता असल्याचेसुद्धा त्यांनी सांगीतले.
पुजा चव्हानचे वडिल लहू चव्हान यांनी याप्रकरणी आमच्या मुलीची व कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रकार हा सर्व प्रकार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यामांच्याआधारे सातत्याने आमच्या मुलीची व आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे.ही बदनामी थांबवावी अशी विनंती मी माध्यमांना केली आहे. तसेच यासंबंद्धिचे निवेदनसुद्धा मुख्यमंत्र्यांना दिले आहे.