पुजा चव्हान या मुळ बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणीने पुणे येथे आत्महत्या केली होती. त्यानंतर काही अॉडअो क्लीप व्हायरल झाल्यात आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले. विरोधात असणार्या भाजपने मुद्धा ऊचलून धरला आणि अखेर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला. आता मात्र पुजा चव्हानच्या कुटुंबियांच्या बाबतीत एक खळबळकनक माहिती पुढे येत आहे. पुजा चव्हानची बहिन दिव्यांगा लहू चव्हान हीस एकाठिकाणी बोलावून तिच्या हातातून मोबाईल हिसकावत एका अज्ञात तरुणीने पळ काढला आहे.
पुजा चव्हान हीची लहाण बहिन दिव्यांगा लहू चव्हान हीस तुझ्या बहिनीबद्दल(पुजा चव्हानबद्दल) बोलायचे आहे, असे म्हणून बोलावण्यात आले. याचदरम्यान तोंडाल स्कार्फ बांधलेल्या एक अज्ञात तरुणीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. सदर घटना ही दि. ४ मार्च रोजी परळी शहरातील फाऊंडेशन शाळेजवळ संध्यकाळच्यावेळी घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
दिव्यांगा ई. दहावीत शिकते. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान दिव्यांगा आणि तिचा मित्रा सौरभ कराड हे हनुमानगडी परिसरात फीरायला गेले होते. दरम्यान तीला अनोळख्या क्रमांकावरुन फोन आला, ज्यामध्ये तुझ्या बहिनीबद्दल बोलायचे आहे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर दिव्यांगा आणि तिचा मित्र फाऊंडेशन शाळेजवळ पोहचले. दरम्यान दिव्यांगा फोनवर बोलत असतांना समोरुन तोंडाल स्कार्फ बाधून आलेल्या अज्ञात तरुणीने तीचा मोबाईल हिसकला आणि पळ काढला. यानंतर सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला असता, काही अंतरावरच ती एका दुचाकीवर बसून स्वार झाली.
या घटनेमुळे पुन्हा पुजा चव्हान प्रकरणाला एक नविन वळण लागले आहे. काही दिवसांअगोदरच पुजा चव्हानच्या चुलत आजीने खळबळजनक दावा केला होता. तेव्हा त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. या घटनेने आता प्रकरणातील गुढ अधिकच वाढवले आहे. परळी शहर पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगीतले.