लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटायला बोलावून तिच्यावर अॅसिड फेकल्याची घटना सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात घडली आहे. पुण्यातील कसबा पेठेत राहणाऱ्या विवाहीत तरुणीवर अॅसिड फेकल्याने सदरील तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अबुझर आय्याज तांबोळी असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पिडीत तरुणी दिवाळीला पतीसह माहेरी आली होती. आरोपी अबुझर तांबोळी याने पीडितेला भेटण्यासाठी पर्वती दर्शन या ठिकाणी बोलावलं. आरोपीला भेटायला तरुणी घटनास्थळी गेली. आता माझं लग्न झालंय माझ्या मागे लागू नको असं पिडीत तरुणीने अबुझरला सांगितलं. मात्र आरोपी ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. ‘तुझे आपने आपपर गूरुर हैं ना, देख मैं अभी तेरा गुरूर तोड देता हुं’ असं म्हणत आरोपीने तरुणीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. त्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. आणि मेडिकल अहवाल मागितला आहे. प्रेम प्रकरणातून सदरील कृत्य केलं गेलं असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. दत्तवाडी पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेतं