पुणे : कोरोना कंट्रोल रूम आता २४ तास उपलब्ध राहणार; कधीही बेड्स बद्दल मिळू शकेल माहिती

18

पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड रुग्णांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या कंट्रोलरुमला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट देऊन विविध सूचना दिल्या. यावेळी महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबोले, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह कंट्रोलरुममधील प्रमुख अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कंट्रोल रुममधील व्यवस्थापनाचा आढावा घेत असताना वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्या ठिकाणी सुरु असणाऱ्या पाच फोनलाईनची संख्या दुप्पट करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

कंट्रोलरुमचे काम आता तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरु राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना कधीही बेड्सबद्दलची माहीती मिळू शकणार आहे. शिवाय या अडचणीच्या काळात प्रत्येक नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपल्या महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सदैव सज्ज राहतील आणि निश्चितच तुमची काळजी घेतली जाईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.