पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री २४ तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर आहेत : चंद्रकांत पाटील

9

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री २४ तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर आहेत. मागील २४ तासांपासून अजित पवार यांच्याशी संपर्क होत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊली गार्डन येथे आनंद हॉस्पिटल धनकवडी व कात्रज-कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान संचलित ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर स्थानिक नगरसेविका मनिषा कदम यांच्या प्रयत्नातून चालू करण्यात आले आहे.या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.

सध्या रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. ते कोणाच्या हातात नाही, अशात काळजी घ्यायला हवी. सध्याची परिस्थिती पाहता या कोविड सेंटरकडून लोकांची चांगली सेवा होईल, अशा शुभेच्छा मी देऊ शकतो, पण हे कोविड सेंटर जास्त काळ चालावे अशा शुभेच्छा मी देणार नाही. ते योग्य नाही.असेही पाटील म्हणाले आहेत.

यावेळी नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, नगरसेवक वीरसेन जगाताप, अशोकानंद कंवर महाराज, राजाभाऊ कदम उपस्थित होते.