पुणे जिल्हा माहिती अधिकाऱ्याचे कोरोनामुळे निधन

7

उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सरग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनानं निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिक तसंच दिवाळी अंकांमधून त्यांची व्यंगचिञ प्रसिद्ध होत असत. बालगंधर्वला त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरले होते.गेल्याच आठवड्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर प्रारंभी त्यांनी हडपसरच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. पण प्रकृती खालावताच त्यांना ससूनच्या आयसीयूत हलवण्यात आलं.

राजेंद्र सरग यांनी नवीन,जुना,लहान, मोठा पत्रकार असा कधीच भेदभाव केला नाही. प्रत्येकास सहकार्य केले. त्यांचे प्रशासकीय काम पाहून येत्या आठवड्यात त्यांचे उपसंचालक पदावर प्रमोशन होणार होते. 

उपचारादरम्यान, वाढलेली त्यांची शुगर शेवटपर्यंत कमी न झाल्याने अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.