पुण्याच्या महापौरांनी मानले नरेंद्र मोदींचे धन्यवाद; केंद्राकडून जिल्ह्याला थेट ‘इतक्या’ लसेचा पुरवठा

58

महाराष्ट्र आणि विशेषतः पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक कोरोना लस सेंटर बंद करावे लागतील अशी परिस्थिती होती. मात्र आता पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. पुण्याला केंद्राकडून थेट लस पुरवठा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून काल जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत.

यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत. त्यामुळे आता अजून लसीकरण करणे शक्य होणार आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली. आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. पुण्यात कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा पुरेपूर वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.