पुणे महानगरालिकेकडून कोरोनाबाधित दिवंगताच्या कुटुंबाना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यास सुरुवात

60

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन दिवंगत झालेल्या सेवकांच्या वारसास कोरोना विषाणू प्रतिबंध आणि उपचार सुरक्षा कवच योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत डिसेंबर २०२० अखेर ५१ (४७ कायम, ४ कंत्राटी) अधिकारी-सेवक कोरोना विषाणू संसर्ग होऊन दिवंगत झाले आहेत.

अशी योजना जाहीर करणारी पहिली महानगरपालिका ही पुणे महापालिका होती. सदर योजनेअंतर्गत सर्व मृत सेवकांचे वारसांना रक्कम रु. २५ लाखांचे अनुदान देण्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार आज प्रातिनिधीक स्वरुपात ५ मृत सेवकांचे वारसांना रक्कम रु. २५ लाखाचा धनादेश, सन्मानपत्र आणि शाल देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

उर्वरित वारसांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ मा. उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेस गटनेते श्री. आबा बागुल, शिवसेना गटनेते श्री. पृथ्वीराज सुतार, आरपीआय गटनेत्या सुनिताताई वाडेकर, मा. अजय खेडेकर, मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रुबल अग्रवाल, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.