ई-बाईक सेवा देणार पुणे ठरणार पहिलं शहर

13

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेले वाहनांचे प्रमाण आणि त्यातून निर्माण झालेला प्रदूषणाचा प्रश्न यावर उपाय म्हणून ‘ग्रीन पुणे’ होण्याच्या दृष्टीने स्थायी समिती ठराव क्र 315, दि.14/02/2020 अन्वये विट्रो मोटर्स इलेक्ट्रीक बाईक रेटींग प्रोजेक्ट राबविण्यास स्थायी समितीची मान्यता मिळालेली आहे. पुणे शहरात वाढते प्रदूषण कमी व्हावे, यासाठी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून विट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीने इलेक्ट्रिक दुचाकीचा प्रस्ताव मांडला होता.

सदर प्रकल्पासाठी सर्व गुंतवणुक विट्रो मोटर्स प्रा.लि. कंपनी करणार असून पुणे महानगरपालिकेची शून्य आर्थिक गुंतवणूक असणार आहे.महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक दुचाकी इलेक्ट्रीक वाहतूक सेवा देणारे पुणे हे पहिले शहर ठरणार आहे.

प्रस्तावामध्ये पुणे शहारामधील मुख्य रस्त्यावरील 500 ठिकाणी 2000 चार्जिंग पॉंइंट्स उभारण्याचे नियोजन असून शहरामध्ये सुरवातीच्या टप्प्यांमध्ये 3000 हजार ते 5000 हजार ई-दुचाकी वापरात आणण्याची संकल्पना आहे.ग्रीन पुणेसाठी इलेक्ट्रीक-बाईक रेटींग प्रोजेक्ट ही संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार आहे