पुणेकरांची अजित दादांना साद : पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा

28

कोरोनाग्रस्त पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीसह विविध ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. त्यावर “मरणं झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा, पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा- कोरोनाग्रस्त पुणेकर”, असं लिहिण्यात आलं आहे.

पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. 

पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिलीय.