पुणेकरांचा सवाल ; काय करत आहेत पुण्याचे कारभारी

22

पुण्यातील परिस्थिती गंभीर बनत असताना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या हातात पुण्याचा कारभार देण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील नागरिकांची चिंता ही दिवसेंदिवस वाढतच आहे. 

राज्यात राजकारण करण्यासाठी बराच काळ पडला आहे पण अशा गंभीर संकटाशी लढत असताना पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी यावेळी पुण्यात राहून या परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं असल्याचं आणि ती त्यांची जबाबदारी असल्याचं मत सामान्य पुणेकर सध्या व्यक्त करत आहेत.

कोरोनाच्या संकटाशी लढत असताना पुण्याचे कारभारी मात्र आठवड्यातून एकच आढावा बैठक घेत असल्यानं नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे. 

पुणे शहराला राजकीय नेतृत्व आहे की नाही? असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडला आहे.शासकीय यंत्रणा वेळेवर काम करत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कोणी आहे की नाही असा प्रश्न जनमानसातून उपस्थित केला जात आहे.