भारतातील वाढती लोकसंख्यावर कंगणा राणावतने भाष्य करत एक वादग्रस्त वक्त केलं आहे.तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना दंड ठोठावावा आणि त्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्यावी, असं वक्तव्य कंगणा राणावतने केलं आहे. कंगणाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगणा लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. ‘थलायवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री सी. जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण त्यानंतर कोविडमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आलंय.
कंगणाच्या या ट्विटवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक कंगणाच्या म्हणण्याला पाठिंबा देत आहेत तर काहींनी कंगणा राणावतला ट्रोल केलं आहे.