पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा राजकारण पेटणार! यावेळी शिवसेना भाजप अामनेसामने

4

गेल्या काही दिवसांअगोदर पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले होते. आता पुन्हा ते चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण गेल्या वर्शभरापासून रखडले आहे. यावर्षी पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडणार मात्र शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही आमदारांनी या कार्यक्रनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

हिंगोलीतील शिवसेनेचे आ. संतोष बांगर यांनी महाशिवरात्रीच्यादिवशी(दि.११ मार्च) पुतळ्याचे लोकार्पन होणार असल्याचे जाहीर केले. तर भाजपचे आ. गोपीचंड पडळकर यांनी मल्हाररावजी होळकर यांच्या जयंतीचे अौचित्य साधून १६ मार्चला पुतळ्याचे लोकार्पन होणार असल्याचे जाहीर केले आहे. अवघ्या पाच दिवसांत या पुतळ्याचे दोनवेळा अनावरण होणार आहे.

भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. एक वर्षापासून पुतळ्याचे अनावरण रखडलेले आहे. “बहूतेक मुख्यमंत्र्यांना माझे कुटुंब माझी जवाबदारी यातून वेळ मिळाला नसेल” अशी टिका त्यांनी यावेळी केली. तसेच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत त्यांनी पुतळ्यासंबंद्धित अनेक व्यथा त्यांचेसमोर मांडल्या आणि पुतळ्याच्या लोकार्पनाची तारीख जाहीर केली. तसेच संतोष बांगर यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र कोरोनामुळे ते लांबले. आता समाजातील जेष्ठ व्यक्तींच्या आशिर्वादात त्यांच्याच हस्ते आम्ही अनावरण करणार आहोत अश सांगत तारीख जाहीर केली आहे.

काही दिवसांअगोदर जेजुरी गडावरील अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले होते. शरद पवार तेथ पुतळ्याचे उद्घाटन करणार होते. मात्र त्याअगोदरच पोहचत गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याचे अनवारण करत शरद पावरसारख्या भ्रष्टाचार्‍यांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्यास लागू देणार नाही अशी घणाघाती टीका केली होती. आता मात्र अौंढा नागनाथ याठिकाणी काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. गोपीचंद पडळकर जिद्दी नेते आहेत तर संतोष बांगर यांची आक्रमक नेते म्हणून अोळख आहे.