बॉलीवूड अभिनेता, निर्माता राजीव कपूर यांचे मंगळवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी राजीव कपूर यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. त्यानंतर त्यांना चेंबूर येथील रुग्णालयात त्यांना नेण्यात आले पण तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या दु:खातून कुटुंबिय सावरत नाही तर आता राजीव कपूर हे जग सोडून गेले आहेत. त्याच्या जाण्याने कपूर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. बॉलिवुडमध्ये कपुर परिवारावर अल्पावधीत दुसऱ्यांदा आलेली ही शोककळा आहे. काही महिन्यांपूर्वीच ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपुर्ण कुटुंब दुःखाच्या छायेत होते.
भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’ राजीव कपूर यांनी १९८५मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ आणि १९८३ मध्ये ‘एक जान हैं हम’मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केले होते.