भाजपला धक्का: 7 नगरसेवकांचा राजीनामा

22

कोकणात आल्यानंतर अमित शहांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. नेमके याचवेळी शाह दिल्लीकडे जातात तोपर्यंत राणेंचे वर्चस्व असलेल्या वैभववाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमळ जास्तच फुलले आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढली, त्याचे श्रेय नारायण, नितेश आनि निलेश राणेंना दिले गेले आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोकणात येऊन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. परंतु, अमित शहा दिल्लीकडे रवाना होताच शिवसेनेने सिंधुदुर्गात भाजपला जबरदस्त धक्का देण्यात यश मिळवले आहे. 

वैभववाडी हे भाजप आमदार नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात येते. येथील नगरपंचायचीमध्ये १७ पैकी १७ नगरसेवक भाजपचे आहेत. तर, त्यातील ७ नगरसेवकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. 

इतकंच नाही तर, काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपलाच रामराम ठोकला आहे. हे सर्वजण शिवसेनेत जाणार अशी खात्रीशीर माहिती पुढे येत आहे