विकासाची कामे करीत असताना ती दर्जेदारच व्हायला हवी, असा नेहमी विचार करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे केलेली कामे किती बारकाईने प्रत्येक पाहणी करतात, याचे उदाहरण रविवारी पुन्हा एकदा आला दिसून आले. अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत अजित पवार यांनी रविवारी पहाटे बारामती शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांना भेटी दिल्या आहेत. दिवस उजाडताचं अजित पवार शहरातील नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या सुरु असलेल्या कामाजवळ येऊन थांबले.
अस्तरीकरणाच्या कामाबद्दल अजित पवार यांनी अस्तरीकरणाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले खरे, मात्र शेजारी केलेल्या पाय-याच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पाय-यांवर सिमेंटच्या कामाला ओल राहावी या साठी गोणपाट झाकून ठेवली होती, मात्र पवार यांनी स्वताःच खाली वाकून ही गोणपाट दूर करत काम पाहिले.
मात्र, पायऱ्या व्यवस्थित सिमेंटने भरल्या नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब खटकल्यानंतर उपस्थित कंत्राटदार आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी आणि पदाधिकारी सर्वांनाच पवार यांचे खडे बोल ऐकून घ्यावे लागले. संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांधकामातील खडान्खडा माहिती असलेल्या अजित पवारांचे त्याने काही समाधान झाले नाही.