बॅकलॉग आणि श्रेणीसुधारची परीक्षा ऑनलाईन माध्यमातून ८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. गेल्या वेळी सराव परीक्षा घेताना त्यामध्ये लॉग इन होणे, प्रश्नांचे पॅनल न दिसणे, फ्रंट कॅमेरा आपोआप बंद होणे, एकाच विद्यार्थ्याला दोन लॉग इन आयडी प्राप्त होणे अशा समस्या आल्या होत्या. त्यामुळे मुख्य परीक्षेत अडचण येऊन विद्यार्थ्यांचे पुन्हा नुकसान होणार असल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसीएशनने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना केला आहे.
ज्या कंपनीने अंतिम वर्षाची परीक्षा घेतली. त्याच कंपनीला या परीक्षेचे काम दिले आहे. त्यामुळे पुन्हा तांत्रिक अडचणीला तोंड द्यावे लागू नये म्हणून नॉन प्रॉक्टर्ड पध्दतीने परीक्षा घ्यावी अशी मागणी संघटनेचे सचिव हर्षद अग्रवाल यांनी कुलगुरूंकडे केली आहे.
यावेळी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू राहणार असून गैरप्रकार होत असल्यास कारवाई होणार आहे. विद्यापीठाने ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली होती.