राज्याच्या मुख्य सचिवांकडे विचारणा : फडणवीस यांच्याकडे दौरे करण्याआधी परवानगी आहे का ?

26

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचा दौरा केला होता. अचानकपणे हा दौरा केल्यामुळे आरटीआ कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. 

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे तक्रार केली आहे. तसंच, फडणवीस यांच्याकडे दौरे करण्याआधी परवानगी आहे का, अशी विचारणाही राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

कोरोनाच्या काळात फडणवीस यांच्याकडे जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमाप्रमाणे अर्ज केला आहे, अशी विचारणा माहितीच्या अधिकारातून मुख्य सचिवांकडे केली आहे.

कोविड सेंटरला भेट देण्यासाठी फडणवीस कोपरगावात दाखल झाले होते. त्यामुळे संजय काळे यांनी याबद्दल शंका व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.