टाटा समुहाचे मालक रतन टाटा यांच्या आयुष्यावर चित्रपट बनणार असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या बायोपिकमध्ये बॉलीवूड अभिनेता आर माधवन हा मुख्य भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर बरेच फोटोही व्हायरल होत आहेत, त्यावरून असे समजत आहे की आर माधवन या चित्रपटात रतन टाटा यांची भूमिका साकारणार आहे.
अभिनेता आर माधवन हा हिंदी आणि तमिळ सिनेसृष्टीमधील गाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे मोजकेच चित्रपट असले तरीही रसिकांच्या मनावर त्याची छाप कायम आहे. त्यामुळे आगामी कोणता सिनेमा करणार याची सातत्याने चाहत्यांना उत्सुकता असते. लवकरचं त्याचे Maara आणि Rocketry: The Nambi Effect हे सिनेमे येणार आहेत. आर. माधवन आणि रतन टाटा या दोघांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे. आर. माधवन या बायोपिकमध्ये रतन टाटा यांची भूमिका साकारणार आहे. यावर आर. माधवने एक ट्विट करुन याबद्दल खुलासा केला आहे.
मात्र यावर आता आर माधवनने स्वतःच खुलासा करत अशाप्रकारे कोणताही प्रोजेक्ट तो करत नसल्याचं त्याने स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की दुर्दैवाने हे खरे नाही. ही फक्त काही चाहत्यांची इच्छा आहे, म्हणून त्यांनी अशी पोस्टर केली आहेत. त्याला सध्या रतन टाटाची भूमिका साकारण्याची ऑफर मिळालेली नाही. असा कोणताही प्रकल्प पाइपलाइनमध्ये नाही. यावर कोणतीही चर्चा चालू नाही.