शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात!

7

आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी आतापर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीस व्यासपीठ दिले नसले तरी आंदोलनावरुन देशातील राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी राज्यसभेत केलेल्या तुफान भाषणांनंतर आता ते शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ थेट मैदानात उतरणार आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी राजस्थानच्या दोन दिवसीय दौर्‍यावर असणार आहेत. यामध्ये ते ५ जिल्ह्यात सभा घेणार आहेत आणि ट्रॅक्टर रॅलीतसुद्धा सहभागिज होणार आहे.

शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केलाय. राहुल गांधी यांनी वारंवार या मुद्यांवरुन सरकारवर टीका केली आहे. आता कॉंग्रेसची सत्ता असणार्‍या राजस्थानमधून ते थेट भूमिका घेत आंदोलनास पाठींबा देणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्ली सिमांवर आंदोलन करीत आहे. आता संपूर्ण देशभारत हे आंदोलन पोहचवण्यासाठी संयुक्त किसना मोर्चाने कंबर कसली आहे. यातच देशभरात आंदोलनाच्या समर्थनार्थ पंचायती घेण्यात येतील अशी घोषणासुद्धा कॉंग्रेसने दिली आहे.

या दौर्‍यादरम्यान राहुल गांधी विविध मंदिरांनासुद्धा भेटी देणार आहेत. सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेऊन राहुल यांना पुढील प्रवास करायचा असल्याचे हे संकते आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. दरम्यान कॉंग्रेसचा आंदोलनाला छुपा पाठींबा असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने होत आलेला आहे.

दिल्ली सिमेवरील आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी आंदोलनाला राजकीय पृष्ठभूमि असे मत होणार नाहिज याची कसोशीने काळजी घेतली आहे. आतपर्यंत विरोधी पक्षातील अनेक काही नेत्यांनी दिल्ली सिमेवर जाऊन राकेश टीकैत यांची भेट घेतली आहे. त्यानंतरआता राजस्थानमधून कॉंग्रेस आंदोलनाच्या समर्थनार्थ ऊतरत आहे. त्यामुळे आंदोलनाला एक वेगळे रुप प्राप्त होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी दिल्ली हिंसाचारानंतर मात्र सतर्कतेची भूमिका घेतली आहे. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आंदोलन दीर्घकाळ चालेन यादृष्टीने सर्व प्रयत्न दिल्ली सिमेवर सुरु आहे.

६०० स्वयंसेवकांचे एक पथक निर्माण करण्यात आले आहे. जे गस्त घालणार आहेत. त्यांच्यावर रात्रीची वाहतूक आणि देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच प्रत्येकाला ओळखीसाठी ग्रीन जॅकेट आणि ओळखपत्रही देण्यात आले आहे. येणारा ऊन्हळा बघता एसी आणि पंख्यांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. १८ तारखेला रेल रोको आंदोलानाची हाक शेतकर्‍यांकडून देण्यात आली आहे.