“राहुल गांधींना शाळेत पाठवण्यात यावं” संसदेत मंत्र्यानी केली अध्यक्षांना केली मागणी

13

सध्या लोकसभेत अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु आहे. सत्ताधिकारी आणि विरोधकांनी एकमेकांना सुनावत चांगलेच वातवारण तापवले. मात्र यादरम्यानच भाजपचे मंत्री गिरीराज सिंह यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला. मस्त्यालय मंत्रालय निर्मीतीच्या राहुल गांधींनी केलेल्या त्या मागणीवरुन त्यांनी राहुल गांधींना सुनावले आहे. “अध्यक्ष महोदय, राहुल गांधी यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्यांना शाळेत पाठवण्यात याव” अशी अजब मागणी करत गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

राहुल गांधी केरळ दौर्‍यावर असतांना त्यांनी काही मच्छिमारांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेसचे सरकार आल्यास मस्त्यालयाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र मस्त्यालय मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा राहुल गांधींनी केली होती. परंतू असे मंत्रालय अगोदरच अस्तित्वात आहे आणि गिरीराज सिंहच या मंत्रालयाचे मंत्री आहेत. राहुल गांधींच्या त्या विधानाला धरुनच गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

मस्त्यापालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपच्या खा. सुनिता दुग्गक भाषण करत होत्या. त्यांच्ये भाषण संपताच गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले.

“दि. २ फेबृवारीला राहुल गांधी यांनी लोकसभेत मस्त्यपालन या विभागावर प्रश्न विचारला होता. परंतू काहीदिवसांत देशातील या विभागाचा त्यांना विसर पडला. राहुल गांधी यांच्या स्मरणशक्तीला असे काय झाले की काहीदिवसांतच अस्तित्वात असलेले मंत्रालय ते पुन्हा निर्माण करण्याची घोषणा करत आहेत. अध्यक्ष महोदय मला याचे खुप दु:ख झाले आहे.” असे म्हणत गिरीराह सिंह यांनी राहुल गांधींना टोले लगावले आहे.