आंदोलनजीवी शब्दावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. आता राहुल गांधी यांनी देखील मोदींच्या त्या शब्दाला प्रत्युत्तर देताना मोदींसाठी एक शब्द वापरला आहे.
केंद्र सरकारने विमानतळांचे खासगीकरण, एलआयसीमध्येही भागीदारी यांसारखे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे, राहुल गांधींनी मोदी हे मित्रांसाठी देश विकायला लागलेत, असे सुचविण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल गांधींनी एक ट्विट करुन मोदींनी ‘क्रोनीजीवी’ असं म्हटलंय. क्रोनी म्हणजे मैत्रीजीवी… असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावलाय.तसेच, देश विकायला लागलाय तो… असे म्हणत राहुल गांधांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे .
बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला होता.
शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला होता. त्यावरुन सध्या आता राजकीय वातावरण तापले आहे.