ज्योतिरादित्यांची बाजू घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना लवकर समजलं की शिंदेंशिवाय मध्य प्रदेशात काँग्रेस शून्य आहे असा खोचक टोला लगावला आहे .
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना बॅकबेंचर असल्याचं म्हटलं होतं.ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल गांधींच्या टीकेचं उत्तर दिलं आहे.
एवढी काळजी राहुल गांधी यांना आता आहे. जेव्हा मी काँग्रेसमध्ये होते तेव्हा इतकी काळजी केली असती तर बरं झालं असतं. यापेक्षा जास्त काही मला बोलायचं नाहीय अस उत्तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांना दिल आहे .
दरम्यान, राहुल गांधीं यांच्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर डिअर राहुल गांधी असा ट्रेंडही सुरु झाला असून यामध्ये ट्रोल केलं जात आहे.
तसेच जे लोक दोन वर्षात काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकले नाहीत ते कोणाला मुख्यमंत्री काय बनवणार? असं असेल तर काँग्रेसनं राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावं असं आव्हानही नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींना दिलं आहे.