केवळ चार-पाच जण देशाचा कारभार करत असल्याचा राहुल गांधींचा अर्थमंत्र्यांना टोला 

4

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला.यावर राहुल यांनी मोदी सरकारवर टीका करताना कुटुंब नियोजनासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या हम दो, हमारे दो या जुन्या घोषणेचा संदर्भ देत केवळ चार-पाच जण देशाचा कारभार करत असल्याचा टोला लगावला.

जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. जावई प्रत्येक घरात असतो परंतु काँग्रेससाठी जावई हे विशेषनाम आहे, असं म्हणत सीतारामन यांनी टोला लगावला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. सीतारामन यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनसंदर्भातील प्रश्नालाही उत्तर दिलं.

ऑगस्ट २०१६ ते जानेवारी २०२० पर्यंत युपीआयद्वारे एकूण ३.६ लाख कोटी रूपयांचं ट्रान्झॅक्शन झालं आहे. युपीआयचा श्रीमंत व्यक्ती करत नाहीत. त्याचा वापर मध्यमवर्गीय व्यक्ती आणि छोटे व्यापारी करतात. ही लोकं कोण आहे. सरकारनं कोणाच्या जावयासाठी युपीआय तयार केलं नाही अशी टीकाही सीतारामन यांनी केली.

राहुल गांधींच्या या टीकेला भाजपकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार हल्ला करताना जावयाचा अर्थात रॉबर्ट वॉड्रा यांचं नाव न घेता उल्लेख करून काँग्रेसला टोला लगावला आहे.