राहुल गांधींनी कोरोनाबाबत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी, मोदींबद्दल बोलताना त्यांनी नौटंकी हा शब्दप्रयोग केला. यावरुन, भाजपाने राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तसेच अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचेही ते म्हणाले. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही राहुल गांधींनी केली आहे.
यावर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे.मोदींच्या या प्रयत्नांबद्दल राहुल गांधी नौटंकी हा शब्दप्रयोग करतात, हा देशाचा आणि देशातील जनतेचा अपमान आहे. आम्ही त्यांच्यासाठी नौटंकी हा शब्दप्रयोग करणार नाही, कारण त्यांची नौटंकी जनतेनं केव्हाच बंद केलीय, असं प्रकाश जावडेकर यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे म्हटले आहे.