काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांचे नाव जवळपास निश्चित; राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार ?

6

काँग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडे जाईल अशी चर्चा कायमच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असते. मात्र आता राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष होतील असं निश्चित बोललं जात आहे.  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे.

या बैठकीत अनेक नेत्यांनी राहुल गांधींकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी लाऊन धरली होती. त्यावरच बैठकीत प्रामुख्याने चर्चा  सुरू असून, राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचं कळतंय. याबाबत अजून अंतिम घोषणा झालेली नाही. मात्र राहुल गांधी यांच्या नावाची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसमधील संघटनात्मक बदल करण्याची मागणी करणाऱ्या 23 नेत्यांसह इतर वरिष्ठ नेतेही सहभागी झाले आहेत. पश्चिम बंगाल आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. पक्षातील नेत्यांची ही मागणी सोनिया गांधी यांनी गंभीरपणे घेतली असून त्यांनीही राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याचे जवळपास निश्चित केल्याचं बोललं जात आहे.