देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ आणि सी वोटरने ओपिनियन पोल जारी केला आहे. यानुसार, या पाचही ठिकाणच्या निवडणुकांच्या विजयाचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमीळनाडू या राज्यांचा तर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपची कामगिरी समाधानकारक असली तरीही एका राज्यांत मात्र भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी मागे टाकलं आहे.
केरळमध्ये 140 जागांसाठी निवडणूक होणार असून 82 जागांवर LDF अर्थात लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट विजयी होणार असल्याचा अंदाज टाइम्स नाऊ-सी-व्होटर सर्व्हेने दिला आहे. केरळमधील 36.36 टक्के लोक या सरकारच्या कामगिरीने खूपच समाधानी असून 39.66 टक्के लोक हे समाधानी आहेत, असं हा सर्व्हे सांगतो.
बहुतांश ठिकाणी भाजपची कामगिरी समाधानकारक असली तरीही एका राज्यांत मात्र भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी मागे टाकलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावापेक्षा राहुल गांधी यांच्या नावाला या राज्याने पसंती दिली आहे.
केरळचे सध्याचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन् यांच्या कामगिरीने केरळ राज्य समाधानी असून त्यांना 42.34 टक्के लोकांनी पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी पसंती दर्शवली आहे.
सर्व्हेनुसार, 55.84 टक्के केरळमधील लोक पंतप्रधान पदी राहुल गांधींना पाहू इच्छितात तर 31.95 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली आहे.