काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.राहुल गांधी यांनीही ट्विटच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘आणखी किती अन्नदात्यांना बळी द्यावा लागेल? कृषी-विरोधी कायदे कधी रद्द केले जातील?कृषी कायद्याच्या निषेधावेळी अनेक शेतकर्यांनी आपले प्राणही गमावले आहेत.
कृषी कायद्याच्या विरोधात हजारोंच्या संख्येने शेतकर्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढला. दरम्यान आतापर्यंत दिल्ली कूचपासून पंजाबमध्ये 22 शेतकर्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे
देशात केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन काही केल्या संपत नाही. शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सातत्याने निषेध करत आहेत. गेल्या 23 दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर तळ ठोकून असून सरकारकडून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करीत आहेत.