त्या पत्रकाराच्या अटकेनंतर राहुल गांधीची प्रतिक्रिया

13

दिल्लीत झालेल्या हिंसाचारनंतर सिंघू बॉर्डवर दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याच वेळी दिल्ली पोलिसांनी मंदिप पुनिया नावाच्या एका पत्रकारास जबरदस्ती अटक केली आहे. मंदिप पुनियाच्या अटकेनंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करीत जो सच से डरते है वे सच्चे पत्रकारो को गिरफ्तार करते है असे लिहीत एक व्हडिअो ट्वीट केला आहे. ज्यामध्ये दिल्ली पोलिस मंदिप पुनियाला अटक करत आहेत.

प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यादरम्यानच काही पत्रकार चुकीची माहिती पसरवून वातावरण खराब करीत असल्याचा आरोप करीत पत्रकारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये राजदिप सरदेसाई यांचे नाव आहे.

दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर रीलीज मंदिप पुनिया असा हॅशटॅग ट्वीटरवर चालविण्यात येत आहे. दिल्ली पोलिस सिंघुि बॉर्डवर जाण्याकरिता पत्रकारांना अडवणूक करीत आहे. काही विशीष्ट पत्रकारांना आत सोडण्यात येत आहे. परंतू या पत्रकारांवार प्रामाणिक पत्रकारिता करीत नाही असे आरोप आहेत. सोशल मिडिया, मुक्त पत्रकारांना सातत्याने अडवण्यात येत आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती दाखविण्यांना जाणिवपूर्वक अडवलं जातयं असा आरोप होत आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर समाजमाध्यमात चांगलेच प्रतिसाद उमटत आहेत.