लाखो लोकांपुढे राहुल वैद्यने केला अभिनेत्री दिशा परमारला प्रपोज

4

‘बिग बॉस’च्या घरामधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रियालिटी शो हे स्क्रिप्टेड असतात अशी चर्चा नेहमी सूरु असते. मात्र यामध्ये अनेकवेळा काही अशा घटना घडतात, ज्या प्रेक्षकांना रियल वाटायला भाग पाडत असतात. आताही अशीच एक आश्चर्य करणारी गोड बातमी बिगबॉस शो मधील स्पर्धक राहुल वैद्यने दिली आहे. आत्ता बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. राहुल वैद्य, जास्मिन भसीन, कविता कौशिक आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत आहेत.

कलर्स टिव्हीने राहुल वैद्यचा हा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केला आहे. यामध्ये राहुल आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसला. त्याने कार्यक्रम सुरू असताना त्यांची जवळची मैत्रीण अभिनेत्री दिशा परमार हिला लग्नाची मागणी घातली आहे. यावेळी तो म्हणाला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आज 11 नोव्हेंम्बर आज तिचा वाढदिवस आहे. मी गेली दोन वर्षांपासून तिला ओळखतो आहे. तिचे नाव दिशा परमार असून ती जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. पण ‘तुझ्यावर प्रेम आहे’ हे सांगायला मला एवढा वेळ का लागला मला माहिती नाही, माझ्याशी लग्न करशील का? मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. असं म्हणत राहुलने दिशाला प्रपोज केला.

दरम्यान, राहुलने पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टवर Disha, HBD आणि marry me? असे लाल रंगाच्या लिपस्टिकने लिहले आहे. राहुलच्या या वक्तव्यामुळे घरात आनंदाचे वातावरण झाले. सगळे स्पर्धक टाळ्या वाजवत होते. आता अभिनेत्री दिशा परमार यावर काय उत्तर देईल याच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. दिशा आणि राहुल एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. राहुलच्या या अंदाजाने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.