मुखपट्टीविना प्रवास करणार्‍यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई

8

कोरोनावर प्रतिबंधीत लस आली असली तरिदेखील सुरक्षेच्यादृष्टीने जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीबद्दल प्रशासन आग्रही आहे. १ फेबृवारीपासून लोकलमधून सामान्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच रेल्वे प्रशासनाने नियमावलीदेखील जारी केली आहे. या नियमांचे ऊल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

लोकलमधून प्रवास करण्यासाठी प्रवास करण्यासाठी
मुखपट्टीविना स्थानकात दाखल झालेल्या ५७१ प्रवाशांविरोधात सोमवारी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. मुखपट्टीचा वापर न करणार्‍या या प्रवाशांना दंड आकारून स्थानकातून माघारी पाठवण्यात आले आहे. राज्य रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाने आणि पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्याय आली. रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून ही माहिती देण्यात आली.9

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५७१ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला होता.
प्रतिबंधित वेळांत काही प्रवाशांनी प्रवासासाठी परवानगी देण्याची आग्रही मागणी केली, मात्र त्या प्रत्येकाला रोखण्यात आले, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.

दरम्यान काही महाभागांनी विनाटिकीट प्रवास केला. अशा प्रवाशांवरसुद्धा कारवाई करण्यात आली. पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे ४०० प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. तसेच मुखपट्टीशिवाय स्थानक आवारात आलेल्या २३७ प्रवाशांवरही दंडात्मक कारवाई केली. जाहीर केलेल्या नियमांचे ऊल्लंघन केल्यास अशीच कठोर कारवाई करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले आहे. असे रेल्वे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यावेळी म्हणाले.