कोरोनादरम्यान लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे काही काळ रेल्वेसेवा बंद होती. काही काळानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरु केल्यानंतरसुद्धा कोरोनाच्या भितीमुळे रेल्वेची ई कॅटरींग सेवा बंद होती. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याचे बघून काही महत्वाच्या स्टेशनवर पुन्हा ई कॅटरींग सेवा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी एक व्हिडिओ ट्वीट करीत ही माहिती दिली आहे.
कोरोनादरम्यान लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे रेल्वासेवा बंद होती. रेल्वेसेवा पुन्हा सुरळीत झाली असतांनासुद्धा कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झालेला नव्हता. अशावेळी प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. त्यामुळे रेल्वेची ई कॅटरींगसेवा बंद होती. मात्र आता कोरोनाच्या रुग्णांत प्रचंड घट आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आता सुरळीतपणे सुरु करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या बंद असलेल्या ई कॅटरींग सेवेमुळे प्रवाशांना खाण्यापिण्याच्या बाबतीत समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतू रेल्वेने ही सेवा पुन्हा सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी प्रवाशांच्या आता खाण्यापिण्याच्या समस्येसवर तोडगा निघणार आहे. कोरोनाचा वेग कमी झाला असला तरीसुद्धा सर्व नियमांचे पालन करुनच ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे या व्हिडीओत सांगितले आहे.