राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार; त्यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात…

63


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  अयोध्या येथे दौरा करणार आहेत. 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते अयोध्येला जाणार असल्याचं समजतंय.

राज ठाकरेंच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अयोध्येला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे आता अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण रंगताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. अयोध्याला जाण्याची कोणाची इच्छा असेल त्यांनी जायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी कुठलाही अधिकचा शब्द बोलणं टाळलं आहे. राम सर्वांचा आहे या अर्थाने त्यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, अयोध्येत एवढा मोठा लढा झालाय. त्यामुळे प्रत्येकानेच तिथे गेले पाहिजे. किंबहुना महाराष्ट्रातील सर्वचे नेत्यांनी अयोध्येत जायला पाहिजे. यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे फक्त अयोध्याच नव्हे तर सर्व देवस्थानांना भेटी दिल्या पाहिजेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.