4 मार्चला राज ठाकरे करणार नाशिक दौरा

11

राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे.

 ते मनसेच्या (MNS) निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. परंतु, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

कोरोनाचा धोका असताना इतक्या लोकांच्या गर्दीत तुम्ही मास्क का घातला नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा राज ठाकरे यांनी ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर पत्रकारांना दिले होते. 

सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी कृष्णकुंज निवासस्थानी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.