‘राजीव तू हे काय केलंस; तुझ्याकडुन अपेक्षा होत्या’

26

राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला.

सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अनेक नेत्यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे.. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?’ अस संजय राऊत म्हणाले आहे.