पंचगंगा नदीवरून राजू शेट्टी आक्रमक ; म्हणाले…

10

आरोग्यविषयक गोष्टीकडे गांभीर्याने न पाहता आरोग्य मंत्री दुर्लक्ष करीत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव्य कोणते?, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केला.

शिरोळ तालुक्यातील प्रदूषित पंचगंगा नदी आणि जलपर्णी याविषयी राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता माजी खासदार.राजू शेट्टी यांनी पंचगंगा पाणी प्रदूषण प्रश्नी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे नाव न घेता निशाना साधला

पंचगंगा पाणी प्रदूषण विषयी स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने लढा देत आहे. अनेक कार्यकर्त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला १५ दिवसांचा भोगावा लागला.

पंचगंगा नदीच्या प्रदुषित पाण्यामुळे तालुक्यातील नागरीकांना कावीळ, जुलाब, टायफॉईड यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो आहे.