गोकुळच्या निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यात रॅली आणि मिरवणुकीवर बंदी

123

उद्या 4 मे रोजी गोकुळ निवडणुकीसंदर्भात रमणमळा इथं मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी बाहेरील तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी गर्दी करण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला आहे. 

तसेच या निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यात रॅली आणि मिरवणुकीवरती बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

तसंच निवडणूक केंद्रांवरती आय कार्ड पाहून सोडल जाणार असून फक्त उमेदवार आणि त्याचे मतदान प्रतिनिधींना आयकार्ड पाहून प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असून कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केल आहे.