नुकतेच राज्य सराकारने शिवजयंती साजरी करण्याबाबत नियमावली जाहीर केली. यावरुन आता भाजपाच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपचे नेते महाविकासआघाडी सरकारवर टीका करत असतांनाच भाजपचे घाटकपोरचे आमदार राम कदम यांनी थेट ऊद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. या पत्रांतून त्यांनी शिवजयंती निर्बंध हटवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा निर्वाणीचा ईशारा दिला आहे.
दरवर्षी १९ फेबृवारीला मोठ्या ऊत्साहात महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी करण्यात येत असते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व सण ऊत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते. आता कोरोनाचा वेग अोसरत असल्यामुळे जल्लोषात शिवजयंती साजरे करण्याचे आयोजकांनी ठरवले होते. परंतू सरकारने नव्याने शिवजयंतीकरिता जाहीर केलेल्या निर्बंधांवरुन या सर्वांवर पाणिज फीरणार असल्याचे चित्र आहे. प्रसंगी शिवप्रेमींमध्येसुद्धा नाराजीजे वातावरण आहे. हाच मुद्दा हेरुन भाजपसुद्धा ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करते आहे. राम कदम यांनी काही मुद्दे ऊपस्थित करत आंदोलनाचा ईशार पत्रातून दिला आहे.
काय म्हणाले राम कदम?
महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत? असा सवाल राम कदम यांनी आपल्या पत्रातून केला आहे. मागील काही काळापासून राज्य सरकार हिंदूची गळचेपी करते आहे. पालघरमधील साधुंच्या हत्येनंतर सरकारने ठोस असे पाऊल ऊचलले नाही. तांडव वेबसीरीजवरसुद्धा काहीही कारवाई केली नाही. आता थेट शिवजयंतीवर निर्बंध लावण्यात येत आहे. हे सहन होण्यासारखे नाही असेसुद्धा राम कदम या पत्रात म्हणाले.
शिवजंयतीवर काय आहव सरकारचे निर्बंध?
- शिवजयंती साधेपणाने साजरी करावी.
- सार्वजनीक ठिकाणी पोवाडे, पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
- महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन बंधनकारक असेल.
- 10 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी जयंती; आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास मात्र परवानगी असेल.
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनानं या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसं आवाहन करावं.