२७ फेबृवारीपर्यंत असेन राममंदिर निधी समर्पन अभियान …

19

ऊत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे ऊभारण्यात येणार्‍या भव्य राममंदिरासाठी रामनंदिर जन्मभूमि तीर्थक्षेत्र तसेच वोश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या निधी समर्पन अभियानाची तारीख लांबवण्यात आली आहे. १५ जानेवारी ते १५ फेबृवारी असा या अभियानाचा कालखंड होता. मात्र आता २७ फेबृवारीपर्यंत हे अभियान चालणार असल्याची माहिती रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र समितीच्यावतीने देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत १५०० कोटींच्या वर निधी जमा झाला असल्याचेसुद्धा यावेळी सांगण्यात आले.

अयोध्या येथील राममंदिर जन्मभूमी हे वादाच्या भोवर्‍यात होते. सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिलान्यासचे उद्घाटन करण्यात आले होते आणि त्यांनतर मंदिरनिर्मीतीस वेग प्राप्त झाला. यादरम्यानच प्रभू श्रीराम यांचे मंदिर संपूर्ण भारतवासियांसाठी आदर्शाची बाब आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचा यात वाटा असावा या हेतून विश्व हिंदू परिषद आणि रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र समिति यांच्यावतीने संपूर्ण भारतभरात निधी समर्पन अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा समारोप १५ फेबृवारीस होणार होता. मात्र आता २७ फेबृवारीपर्यंत अभियान चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या अभियानासाठी राम मंदिर न्यासानं भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये खाती उघडली आहेत. विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ यांचा मोठा सहभाग या अभियानात आहे. घरोघरी जाऊन कार्यकर्ते निधी गोळा करत आहे. ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी ११ फेब्रुवारीपर्यंत राम मंदिरासाठी १५११ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला आहे. या संपूर्ण अभियानासाठी १३ कोटींहून अधिक १० रुपयांचे, १०० रुपयांचे आणि १००० रुपयांचे कूपन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीकडून छापण्यात आले होते.