रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा 25 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त रिपाइं तर्फे संघर्षदिन म्हणून देशभर लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.
तळागाळातून रामदास आठवले हे बहुजनांचे संघर्षनायक ठरले आहेत. कोरोनाच्या काळात रामदास आठवले यांनी दिलेला गो कोरोना कोरोना गो चा नारा जगभर प्रसारित झाला. कोरोना विरुद्ध लढण्याची,संघर्ष करण्याची हिम्मत प्रेरणा देणारा नारा ठरला. पीडितांना न्याय हक्का साठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे संघर्षनायक नेतृत्व म्हणून रामदास आठवले लोकप्रिय आहेत .त्यामुळे संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे दरवर्षी संघर्षदिन म्हणून देशभर साजरा जातो.
यंदा देशभर रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त गरिबांना अन्नधान्य वाटप रुग्णांना फळवाटप, गरिबांना कपडे वाटप,चादर वाटप तसेच आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर असे लोकपोयोगी उपक्रम राबवून रिपाइं तर्फे देशभर येत्या 25 डिसेंबर रोजी संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती रिपाइं चे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.