राज्यसभेत दि. ११ फेबृवारीला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळेस राहुल गांधी यांनी विविध विषयांद्वारे भाजप आणि पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका केली. केंद्रातील भाजपनसरकार म्हणजे “हम दो हमारे दो पद्धतीचे आहे” असे विधान केले होते. यानंतर राहुल गांधींना प्रतिसादसुद्धा मिळाला तर भाजप समर्थकांनी त्यांच्यावर टीकेची झोड ऊडवली. यातच आता केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनीसुद्धा उडी घेतली आहे.

‘हम दो, हमारे दो’ हा नारा राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने लग्न करावे अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. “राहुल गांधींच्या हम दो हमारे दो या आरोपामध्ये काहीही तथ्यता नाही. ते शेतकरी आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत” असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने  पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  रामदास आठवले यांनी नविन कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत कायद्यांबद्दल स्पष्टीकरण यावेळी दिले. “शेतकरी आपला माल जिथं जास्त पैसे मिळतील तिथं विकू शकतात. शेतकऱ्यांच्या विरोधातील हा कायदा नाही. शेतकरी असल्याने आम्हाला खायला मिळतंय याची आम्हालासुद्धा कल्पना आहे. हा कायदा .शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणलेला आहे. मात्र, गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असेसुद्धा यावेळी ते बोलत होते.

नविन कृषी कायद्यांवरुन सर्व विरोधक पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत आहे. देशभरातील शेतकरी या कायद्याच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा येथील शेतकरी विरोध करत आहेत. मूळ शेतकरी आंदोलनात आलेलाच नाही. असे रामदास आठवले म्हणाले.